177590753591836708020762929073471.

“चावी हरवण्याची भीती वाटतेय? मग हे फिंगरप्रिंट लॉक आहे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन!”

Spread the love
17759075359187E36708020762929073471 515x1024
डिजिटल लॉक, हाय-टेक सुरक्षा! आता कुलूप उघडण्यासाठी चष्मा लावून किल्ली शोधायची गरज नाही.

आपण अनेकदा घराची किंवा कपाटाची चावी कुठे ठेवली हे विसरतो किंवा प्रवासात चावी हरवण्याची भीती असते. पण आता तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, तुमची ‘बोटाची छाप’ (Fingerprint) हीच तुमची चावी बनू शकते. आज आपण अशाच एका भन्नाट गॅझेटबद्दल माहिती घेणार आहोत – स्मार्ट फिंगरप्रिंट लॉक.

हे स्मार्ट कुलूप नक्की काय आहे?

तुमच्या स्मार्टफोन ला बनवा रिमोट
हे कुलूप दिसायला अगदी सेम आपल्या सामान्य कुलपासारखेच असते, पण याला चावी लावण्यासाठी छिद्र नसून त्याऐवजी यामध्ये एक बायोमेट्रिक फिंगरप्रिंट सेन्सर असतो. जसे आपण आपला स्मार्टफोन फिंगरप्रिंटने अनलॉक करतो, तसेच हे कुलूप फक्त स्पर्शाने उघडते.

या कुलपाची खास वैशिष्ट्ये (Features):

चावी विरहित सुरक्षा: तुम्हाला आता खिशात जड चाव्यांचा जुडगा घेऊन फिरण्याची गरज नाही.


वेगवान सेन्सर: प्रगत तंत्रज्ञानामुळे हे कुलूप अवघ्या ०.५ ते १ सेकंदात उघडते.


अनेक युजर्सची सोय: तुम्ही यामध्ये एकापेक्षा जास्त (सहसा १० ते २०) लोकांच्या बोटांचे ठसे सेव्ह करू शकता.त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य याचा वापर करू शकतात.


रिचार्जेबल बॅटरी: यामध्ये एक इनबिल्ट बॅटरी असते, जी USB केबलने चार्ज करता येते. एकदा चार्ज केल्यावर हे कुलूप साधारण ६ महिने ते १ वर्षापर्यंत चालते. डिपेंड आहे त्याच्या बॅटरी वर.

17759077684167E25738376001851249946 485x1024
वेगवान आणि सुरक्षित: फक्त एका टचमध्ये लॉक उघडा, सेकंदाच्या आत!

Oppo ने लॉंचं केली त्यांची फेमस F सिरीज


मजबूत बांधणी: हे कुलूप सहसा ‘झिंक अलॉय’ (Zinc Alloy) पासून बनवलेले असते, जे तोडणे कठीण असते.

17759080240707E24232763384978586876 535x1024
“२०२६ मधील सर्वोत्तम बजेट स्मार्ट लॉक्स – पूर्ण माहिती मराठीत.”

याचा वापर कुठे करता येईल?
१. घराचे मुख्य गेट किंवा ग्रिल.
२. ऑफिसचे कपाट किंवा ड्रॉवर.
३. जिम किंवा शाळेची बॅग.
४. सायकल लॉक करण्यासाठी.

खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा:


वॉटरप्रूफ रेटिंग: जर तुम्हाला हे कुलूप बाहेरच्या गेटला लावायचे असेल, तर ते IP65 किंवा IP66 वॉटरप्रूफ आहे का ते नक्की तपासा.

फूड प्रोसेसर चे प्रकार पाहिले का?


बॅटरी इंडिकेटर: बॅटरी कमी झाल्यावर अलर्ट देणारी सुविधा असेल तर जास्त सोयीचे ठरते.


इमर्जन्सी अनलॉक: बॅटरी पूर्ण संपली तर पॉवर बँक जोडून ते तात्पुरते सुरू करण्याची सोय आहे का ते पहा.

17759077027517E28913871620347783445 492x1024
स्मार्ट सुरक्षा, स्मार्ट जीवन! सुरक्षेची एक नवी पायरी.


सुरक्षा आणि सोय यांचा विचार केला तर Smart Fingerprint Lock हे आजच्या काळातील एक आवश्यक गॅझेट आहे. जर तुम्हाला चाव्या सांभाळण्याचा कंटाळा आला असेल, तर हे नक्कीच ट्राय करण्यासारखे आहे.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन गॅझेट्सच्या माहितीसाठी ‘मराठी गॅझेटर’ला फॉलो करा!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *